PCMC : महापालिकेच्या आयटीआय मधील 12 विद्यार्थ्यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थ्याची अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच 12 विद्यार्थ्यांची शिकाऊ उमेदवारांची अंतर्गत एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड झाली आहे.

Pune : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

एन्प्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पिंपरी या कंपनीने शिकाऊ उमेदवारीसाठी 17  औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी येथील ड्राफ्टसमन मेकॅनिकल ट्रेडच्या 18 प्रशिक्षणार्थ्यांच्या मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या होत्या. 18 प्रशिक्षणार्थ्यांपैकी 12 प्रशिक्षणार्थ्यांची कंपनीने निवड केली आहे. यामुळे प्रशिक्षणार्थीना अंतिम परीक्षा होण्यापूर्वी व सत्र संपण्यापूर्वीच निवड झाल्याने प्राचार्य शशिकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
कंपनीचे सिनीयर मॅनेजर जगदीश न्हावकर व एचआर स्पेशालिस्ट केशव सिन्हा यांचे गटनिदेशक प्रकाश घोडके यांनी आभार मानले. प्र.गटनिदेशक रविंद्र ओव्हाळ व निदेशक विक्रमसिंह काळोखे व संस्थेचा माजी प्रशिक्षणार्थी सलमान शेख यांनी प्रशिक्षणार्थ्यांना ट्रेनिंग व इंटरव्हयूबाबत मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.