Juni Sangvi : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डॉजबॉल संघात निवड

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तपणे भोसरी येथे सुरू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पधेँमध्ये जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करीत राज्यस्तरीय संघातील आपले स्थान निश्चित केले.

सतरा वर्षाखालील डॉजबॉल स्पर्धेत भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये गौरव टिळेकर, ओंकार टाक, मधुरा भगत, ऋतुजा काळे या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डॉजबॉल संघाकडून खेळण्यास निवड झाली आहे. तर लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सतरा वर्ष वयोगटातील डॉजबाल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या संघात भार्गवी लवडकर, सुमय्या पिरजादे, तसेच मुलांच्या संघात अक्षत पिंगळे, आदित्य सोलंकी यांची राज्यस्तरीय डॉजबॉल संघात निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे आणि जीवन सोलंकी यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे पाटील, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.