Pune News : अंकित वाड्.मयीन ग्रंथ निवड समितीवर ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांची निवड

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहर येथील साहित्यिक सुरेश कंक यांची निवड महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे अंकित वाङमयीन ग्रंथ निवड समितीवर नुकतीच करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पथनाट्य लेखन, नाट्य लेखन, कथा, लघुकथा, विविध विषयांवरील अनुभविक लेखन सुरेश कंक करीत आहेत. त्यांनी  रस्त्यावर उतरून वासुदेव, पोतराज, देवीचा भुत्या, नंदीबैल घेऊन, अर्ध नारी नटेश्वर बनून, गोरा आणि काळा वेशभूषा लेऊन, जोकर बनून, रंगीत संगीत घोडा घेऊन तर कधी आधुनिक युगाचा रोबोट बनून एड्सची जनजागृती केली.

याची  दखल घेऊन सुरेश कंक यांची निवड महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे  यांनी नियुत्तीचे पत्र दिले. पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत साहित्यिकावर ही जबाबदारी देताना आनंद होत आहे असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कवी राजेंद्र वाघ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.