
Maval : तालुक्यातील बचत गट हे पंचायत समितीला जोडण्यात यावे – सायली बोत्रे
Self help groups in the taluka should be attached to the Panchayat Samiti - Sayali Botre

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील बचत गट हे पंचायत समितीला जोडण्यात यावे असे आशयाचे निवेदन भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्याकडून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने पंचायत समिती मावळला निवेदन देण्यात आले.
पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले व ब्लॉक कमिशन तालुका अभियान व्यवस्थापक गायकवाड साहेब यांच्यावतीने प्रगती इंगळे यांनी निवेदन स्विकारले.
मावळ तालुक्यात अनेक बचत गट हे पंचायत समितीला जोडले गेले आहेत काही बचत गटांची कागदपत्रे दिली गेली आहेत परंतु ते अजून ऑनलाईन झाले नाही असे सर्व बचत गट जोडण्यात यावे तसेच काही गट पाच वर्ष दहा वर्ष गट चालतात परंतु ते पंचायत समितीला जोडले गेले नाही असे सर्व गट पंचायत समितीला जोडले तर शासनाच्या विविध योजनांचा महिलांना लाभ घेता येईल तसेच तालुक्यात अनेक गावांमध्ये बचत गट सीआरपी नेमणूक केली गेली परंतु ज्या गावांमध्ये नेमणूक झाली नाही त्या गावांमध्ये देखील नेमणूक व्हावी म्हणजे बचत गट हे अधिक सक्षमपणे काम करतील.
निवेदन देण्यासाठी भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे, कार्याध्यक्षा सुमित्रा जाधव, संघटन सरचिटणीस कल्याणी ठाकर, उपाध्यक्ष रोहिणी गाडे, उपाध्यक्ष मनीषा कुंभार, सचिव सपना देशमुख, नाणे मावळ अध्यक्ष सिमा आहेर, पवन मावळ अध्यक्ष अश्विनी साठे, चांदखेड गण अध्यक्ष वैशाली घारे व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
