_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Ban on Colour TV Import : आत्मनिर्भर ! ‘रंगीत टिव्ही’च्या आयातीवर केंद्र सरकारची बंदी

2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7,120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती

एमपीसी न्यूज – पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारनं देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे. रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे.

सरकारची बंदी 14 इंचाच्या टिव्हीपासून 41 इंच आणि त्यावरील टिव्हीसाठी लागू असणार आहे. तर दुसरीकडे पत्रकानुसार 24 इंचापेक्षा कमी असलेल्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टिव्हींवरही सरकारनं बंदी घातली आहे. जर बंदी घातलेल्या या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू आयात करायची असेल तर डीजीएफटीकडून त्याचा परवाना घ्यावा लागेल.  दरम्यान, परवाना देण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे परदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटीद्वारे) जारी केली जाणार आहे.

भारत चीन आणि व्हिएतनाम व्यतिरिक्त  हाँगकाँग, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या देशांकडूनही रंगीत टीव्ही आयात करतो. वाणिज्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतात रंगीत टीव्हीची सर्वाधिक आयात चीन आणि व्हिएतनाममधून होते.

2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7,120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती. तर आर्थिक वर्ष 2020  मध्ये यात घट होऊन ती 5,514 कोटी रूपये इतकी झाली, 2019 या आर्थिक वर्षात रंगीत टीव्हीच्या आयातीत 52.86 टक्क्यांची वाढ झाली होती. परंतु आता सरकारनं रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.