कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पुणे शाखेतर्फे परिसंवादाचे आयोजन

एमपीसी न्यूज: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, आकुर्डी, पुणे – II यांच्याद्वारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे केल्या गेलेल्या विविध प्रकारच्या संकल्पनांसंदर्भात 28.09.2022 रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. मा. अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त श्री. एम. एस. के. वी. वी. सत्यनारायण, पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा येथील मेसर्स ‘द फर्न’च्या आवारात हा कार्यक्रम संपन्न झाला.

सदर परिसंवादामध्ये ई – नामांकन, आधार संलग्नीकरण, केवायसी अद्ययावत करण्यासंदर्भात आणि भविष्यात त्याद्वारे होणा-या लाभासंदर्भात हितधारकामध्ये जनजागृती करण्यात आली.

Rotary Club : जागतिक शांतता दिनानिमित्त रोटरी तर्फे शांतता फेरीचे आयोजन

तसेच सदर परिसंवादात प्रोफाइल सुधारणा, केवायसी सुधार/ परिवर्तन, ई – स्वाक्षरी संबंधित विविध मुद्दे तसेच त्या संदर्भातील अधिकतम माहिती या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच संबधित हितधारक / ग्राहक यांना आवाहन करण्यात आले की, विविध वेबसाइट, फोन कॉल्स, एस एम एस, ई मेल आशा विविध प्रकारच्या सामाजिक मध्यमाद्वारे आलेल्या प्रस्तावापासून सावधानी बाळगावी. भविष्य निधी दाव्याचा निपटारा, वाढीव पेंशन आणि भविष्य निधी द्वारा देण्यात येणा-या विविध सेवा संदर्भात बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात येते. त्या संदर्भात सावधानी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहभागी सर्वानी या संकल्पनेचे कौतुक केले. भविष्यात अशाच प्रकारचे परिसंवाद आयोजीत केले जावे, अशी इच्छा व्यक्त केली. या परिसंवादात श्री. के. रविद्र कुमार कर्मचारी भविष्य निधी आयुक्त – I, आकुर्डी, पुणे , श्री. मनोज माने कर्मचारी भविष्य निधी आयुक्त – II, श्री. मनोज असरानी प्रवर्तन अधिकारी व श्री. आलोक कुमार, श्री. चंद्रशेखर आझाद, श्री. अखौरी संदीप प्रसाद, श्री. हेमराज मेहरा आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.