Pimpri : रस्त्यावर खड्डा पडलाय, कचरा साचलायं, 9922501450 व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर माहिती पाठवा

महापालिकेचे आवाहन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही भागातील रस्त्यावर खड्डा पडला आहे. रस्ते खराब झाले आहे. कचरा साचलाय, स्वच्छता केली नसल्याचे तक्रार करण्यासाठी महापालिकेने एक मोबाईल नंबर दिला आहे. 9922501450 व्हॉट्सअ‍ॅपवर ठिकाणीचे फोटो आणि माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका तत्काळ ही समस्या मार्गी लावणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात विशेषत: पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करणेकामी व परिसर साफ सफाईकामी महापालिका कटीबद्ध आहे. नागरिकांची असुविधा दूर व्हावी व त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कमीत कमी वेळेत उचित कार्यवाही व्हावी. महापालिकेने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

आपण वास्तव्यास असलेल्या भागात पावसाळ्यात खड्डे पडल्यास किंवा रस्ता खराब झाल्यास तसेच परिसर स्वच्छतेसाठी, अशा ठिकाणचे फोटो व संपूर्ण पत्ता इत्यादी माहितीसह महापालिकेच्या 9922501450 या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठविण्यात यावे. नागरिकांच्या समस्याचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदर बाबतची तक्रार सारथी हेल्पलाईन नंबर 8888006666  या दूरध्वनीवर नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.