Pune News : मेट्रोचे बॅरिकेट अंगावर पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज : मेट्रोचे लोखंडी बॅरिकेड अंगावर पडल्याने बस ची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कोथरूड परिसरातील वनाज बस स्टॉपवर 9 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. मारुती लक्ष्मण नवस्कर (वय 64) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी मेट्रोचे काम पाहणाऱ्या कंपनीसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मारुती नवस्कर हे नऊ सप्टेंबर रोजी पिरंगुट येथे जाण्यासाठी वनाज बसस्थानकावर बस ची वाट पाहत थांबले. यावेळी मेट्रोच्या कामासाठी लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड त्यांच्या अंगावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.