गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pune Crime : 66 वर्षीय वृद्धाचे अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज : एका उच्चभ्रू सोसायटीत स्विमिंग पूल आणि जिमचा केअर टेकर असणाऱ्या एका 66 वर्षी वृद्धाने दोन सख्या अल्पवयीन बहिणींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी भागात हा सर्व प्रकार घडला.(Pune Crime) चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 42 वर्षीय डॉक्टर आईने तक्रार दिली आहे. विनयभंग व पोस्कोनुसार गुन्हा नोंद केला आहे. 

Pune News : रिक्षा बंदमुळे नागरिकांची गैरसोय, पीएमपीएमएलच्या 100 जादा बसेस ऱस्त्यावर

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार या डॉक्टर असून, त्या या सोसायटीत राहण्यास आहेत. तर, आरोपी हा या सोसायटीतील स्विमींगपूलचा आणि ओपन जीमचा केअर टेकर होता.(Pune Crime) त्यादरम्यान, त्याने मुलींशी अश्लील चाळे केले त्यांना ओळखपत्र बनवून देताना त्यांच्याशी अश्लील बोलून त्यांचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Latest news
Related news