Moshi News : ओळखीच्या व्यक्तीच्या नावाचा मॅसेज करत ज्येष्ठ महिलेची 1 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज ओळखीच्या व्यक्तीचे नाव वापरून मॅसेज करत 70 वर्षीय ज्येष्ठ महिलेची 1 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Moshi News) विशेष म्हणजे ही फसवणूक वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून करण्यात आली आहे. हा प्रकार 24 जून 2022 रोजी मोशी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.28) फिर्याद दिली असून पोलिसांनी 9860425896,  9336440959, 7017458212 या तीन मोबाईल क्रमांकावरून अब्दुल नावाने एसएमएस कऱणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मित्राने केले नाक फ्रॅक्चर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या ओळखीचा इसम अब्दुल बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर 50 हजार रुपये पाठवल्याचा खोटा एसएमएस पाठवला. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादीकडून आरोपीने पुढे गुगल पे द्वारे 1 लाख रुपये उकळले.(Moshi News) अद्यापही पैसे परत न मिळाल्याने फिर्यादी यांनी अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एमआयडीसी भोसरी पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.