रविवार, जानेवारी 29, 2023

Pune News: पुणे सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज : पुणे सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी आज शुक्रवार 2 डिसेंबर रोजी अटक केली आहे.

याबाबत 23 वर्षीय पुरुषाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग(लाच लुचपत प्रतिबंधक)पुणे यांच्याकडे तक्रार केली होती. सचिन देठे, वय 39 वर्षे, वरिष्ठ लिपिक सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या मावस भावाच्या विरुद्ध दाखल असलेल्या खून व मोक्का केसचा खटला सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे येथे सुरू असून खटल्याच्या साक्षीची जाब जबाब टायपिंग करताना आवश्यक ते बदल करून त्या केसमधून सुटकेसाठी मदत करतो, असे सांगून वरिष्ठ लिपिक सचिन देठे यांनी दहा लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार ला. प्र. वि. पुणे येथे दिली होती.

Pune News: पुणे रेल्वे विभागात एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यांत 16 कोटी 64 लाख रूपये दंड स्वरूपात वसूल

या तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी देठे यांनी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली व त्यापैकी 1.5 लाख रुपये स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे आरोपी देठे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला प्र. वि. पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला प्र. वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

Latest news
Related news