Pune : ज्येष्ठ पत्रकार आणि ‘सकाळ’ चे माजी समूह संपादक अनंत दीक्षित यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ पत्रकार आणि ‘सकाळ’ चे माजी समूह संपादक अनंत दीक्षित यांचे आज सायंकाळी एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

अनंत दीक्षित हे मूळचे सोलपूर जिल्ह्यातील बार्शी येथील रहिवासी. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात कोल्हापूर सकाळपासून सुरु झाली. ते बरेच वर्षे कोल्हापूर सकाळचे संपादक होते. त्यानंतर ते पुण्यात सकाळमध्ये रुजू झाले होते. सकाळचे ते काही वर्षे मुख्य संपादक होते. जवळपास २० वर्षे सकाळमध्ये काम केल्यानंतर ते पुणे लोकमतमध्ये गेले होते. एक अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.