Maval : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाराम राक्षे यांचे निधन

एमपीसी न्यूज – साळुंब्रे येथील मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रथम माजी अध्यक्ष व पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाराम बळवंत राक्षे (वय 71) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत होते. साळुंब्रे ग्रामपंचायतीचे सरपंच व साळुंब्रे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

साळुंब्रे गावचे माजी सरपंच धनंजय राक्षे यांचे चुलते तर डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे खजिनदार युवा उद्योजक निलेश राक्षे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.