Pimpri : शहर पोलीस दलातील सहायक आयुक्त, वरीष्ठ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. 1) रात्री उशिरा दिले आहेत. 

 

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांची पिंपरी विभाग, विशाल हिरे यांची वाकड विभाग तर बाळासाहेब कोपनर यांना गुन्हे एक येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्याकडे गुन्हे एक या विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

दरम्यान त्यांची खंडाळा येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपाधीक्षक पदावर बदली झाली. त्यामुळे शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांची वाहतूक शाखेत बदली झाली आहे. सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ हे असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.