Talegaon Dabhade : वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांचा पत्रकार संघाकडून सत्कार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांचा तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच झालेल्या अंतर्गत बदल्यांमध्ये मधुकर सावंत यांची तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. सावंत यांनी पदभार घेतला असून गुरुवारी (दि. २५) त्यांचा सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष मनोहर दाभाडे, उपाध्यक्ष तात्यासाहेब धांडे, सचिव सोनबा गोपाळे गुरूजी, खजिनदार बी एम भसे, सदस्य सुनील वाळुंज, अतुल पवार, प्रभाकर तुमकर, श्रीकांत चेपे आदी उपस्थित होते.

सावंत हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रूजू झालेले आहेत. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद पोलीस मंडळात विविध ठिकाणी काम केलेले आहे. पोलीस प्रशासनाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. समाजामध्ये पत्रकार आणि पोलीस यांनी विशेष विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहीजे, असे त्यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रम प्रसंगी स्वागत सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले तर आभार बी एम भसे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.