Vadgaon News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मावळ भाजपचे ज्येष्ठ नेते खंडू शंकर असवले यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते काळूराम असवले व शिवाजी असवले यांचे ते वडील होत.

0

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, टाकवे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष खंडू शंकर असवले (वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. असवले यांचा राजकीय, सामाजिक व सहकार आदी क्षेत्रांशी मोठा सहभाग होता.

सामाजिक कार्यकर्ते काळूराम असवले व शिवाजी असवले यांचे ते वडील होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.