Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणशेठ लाडभाऊ खांडगे यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव (स्टेशन) येथील शेतकरी कुटुंबातील आणि जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणशेठ लाडभाऊ खांडगे ( वय 99) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी , एक भाऊ, एक बहिण, सुना, पुतणे, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

उद्योजक सुरेश खांडगे यांचे ते बंधू तर उद्योजक दिलीप खांडगे,माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, माजी नगरसेवक केदार खांडगे यांचे ते काका होते . आणि उद्योजक विलास खांडगे, कामगार नेते प्रविण खांडगे, पै.गणेश खांडगे यांचे ते वडील होते . तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे यांचे ते आजोबा होते .

त्यांचा अंत्यविधी उद्या मंगळवार दि 25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10:00 वा. बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.