BNR-HDR-TOP-Mobile

Hadapsar : सोन्याच्या बिस्किटांच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – हडपसर येथे एका 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला सोन्याच्या बिस्कीटांचे आमिष देत पिवळ्या धातूची बिस्किटे देऊन त्यांच्या गळ्यातील 48 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि.13) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.  

मुक्ताबाई जवळकर (रा. आळंदी) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दोन अनोळखी इसमांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताबाई या सोमवारी दुपारी हडपसर गाडीतळ येथून हडपसर गाव येथे त्यांच्या मुलीकडे जात होत्या. यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी मुक्ताबाई यांना तुम्हाला तुमच्या गळ्यातील दागिने काढून द्या त्याबदल्यात मी तुम्हाला सोन्याचे बिस्कीट देतो, असे सांगून बोलबच्चन करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या गळ्यातील 48 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतले.मात्र, सोन्याचे बिस्कीट न देता पिवळ्या धातूचे बिस्कीट देऊन त्यांची फसवणूक करून पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुक्ताबाई यांनी हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2