Pimpri : पीएमपीएमएल बसमध्ये ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीची 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास केली. ही घटना चिंचवड येथील बीआरटी बस थांब्यावर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी रत्नप्रभा किरण कोळेकर (वय 59, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कोळेकर या शुक्रवारी पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांच्या हातातील 18 हजार रूपये किंमतीची 12.5 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.