Pune : काकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पुतणीचे अश्लील फोटो पाठवले, तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Sent obscene photos of niece on uncle's WhatsApp, Filed a case against the accused काकाने पुतणीला बोलावून ते फोटो दाखवत विचारणा केली. तिने रडत रडत आरोपींनी जबरदस्तीने हे फोटो काढल्याचे सांगितले. 

एमपीसी​ न्यूज ​- काकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अल्पवयीन पुतणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या तीन आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावात घडला. याप्रकरणी एका पस्तीस वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. 

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एक जुलै रोजी दुपारी घरात त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चेक करत होते यावेळी त्यांना आरोपींच्या मोबाईलवरून त्यांच्या 16 वर्षीय पुतणीचे अश्लील फोटो पाठवल्याचे आढळून आले. लोणी स्टेशन परिसरातील हे फोटो होते. त्यानंतर फिर्यादीने मुलीला बोलावून ते फोटो दाखवत हा काय प्रकार आहे, अशी विचारणा केली. यावेळी तिने रडत रडत आरोपींनी जबरदस्तीने हे फोटो काढल्याचे सांगितले.

यानंतर फिर्यादीने पुतणीची बदनामी केल्याप्रकरणी आरोपींविरोधात लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.