Chikhali : पैशाच्या वादातून सराईतावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – पैशांच्या वादातून सात जणांच्या टोळक्याने एका सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री स्पाईन रोड येथे भिमशक्तीनगर परिसरात घडली.

_MPC_DIR_MPU_II

संतोष महादेव निंगुने (26, रा. धायरी, पुणे) असे हल्ल्यात जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी शुभम नितीन काळभोर (वय 19) अमित माहादेव साठे (वय 18), रोहित रुपेश खोत (वय 21), निलेश गुरुलिंग स्वामी (वय 21), शुभम सुभाष कांबळे (वय 19) अमर महादेव साठे (वय 19), सागर सुरेश तरकसे (वय 20, सर्व रा. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जखमी निवंगुणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर सर्व आरोपी देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. निवंगुणे याचे आरोपींसोबत पैशांवरून वाद सुरू होते. रविवारी रात्री निवंगुणे हा एका मित्रासोबत चिखली येथे आरोपींकडे पैसे मागण्यासाठी आला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाल्याने आरोपी टोळक्याने निवंगुणेवर तलवार कोयत्याने वार केले. यामध्ये निवंगुणे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.