Pune News : सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पूनावाला यांना एशियन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भरीव योगदान दिल्याबद्दल पूनावाला यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. संपूर्ण भारत वाचकांसाठी ही एक भूषणावह बाब आहे. सिंगापूर येथील दी स्ट्रेट्स टाइम्स या वर्तमानपत्रा कडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

सद्यस्थितीत संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनावरील लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट कडे लागले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्रोझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोविशील्ड लसीचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात करीत आहे. काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देत कोविशील्ड लसीच्या निर्मितीची माहिती जाणून घेतली होती. या लसीचे भारतातील दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

या पुरस्कारासाठी आशियातील सहा व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आदर पूनावाला यांच्यासह तिने चे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉक्टर रुईची मोरीसीटा, चीनचे संशोधक झांग याँगझेन, सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग, दक्षिण कोरियाचे उद्योगपती विवो जुंग जिन यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.