Lonavala : राष्ट्र सेवा हीच खरी देश सेवा – शिवथरे

एमपीसी न्यूज – राष्ट्र सेवा हीच खरी देश सेवा आहे. ही देश सेवा खर्‍या अर्थाने विद्यार्थी दशेत मनामनात कोरली आणी त्याचा उपयोग आयुष्यभर देश सेवेसाठी व्हावा हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मत लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी व्यक्त केले. 

कुसगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयात 49 वा राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शिवथरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजीचे प्राचार्य डाॅ. एम.एस.गायकवाड, उपप्राचार्य डी.डी.चौधरी, संपर्क संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रदिप वाडेकर, स्थावर मालमत्ता अधिकारी पंकज जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी एस.एस. देवर्षी हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी महिला सबलीकरण या विषयावर पथनाट्य सादर करत त्यामधून स्वच्छतेचा संदेश दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.