Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या  वाढदिवस व सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या  वाढदिवस व सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले. 

मतदारसंघात प्रत्येक प्रभागात फिरत्या दवाखान्याचे आयोजन करण्यात आले. मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रत्येक प्रभागात  “फेस शिल्ड व मास्क वाटप” करण्यात आले. सोनावणे हॉस्पिटलमध्ये भेट देऊन  तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.  तेथील कोरोनाग्रस्त रुग्णांना त्यांच्या  हस्ते फळे वाटप करण्यात आली.

त्यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, नगरसेवक योगेश समेळ, मनिषा  लडकत, मतदारसंघ अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राणी कांबळे व  मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.