SET Exam News : सेट परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

एमपीसी न्यूज -सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी (SET Exam News ) राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 26 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी एक लाख 19 हजार 813 उमेदवारांनी अर्ज केला असून, या सर्व उमेवारांना त्यांच्या लॉगइन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत.

 

 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट आयोजित करण्यात येते. यंदाची 38 वी परीक्षा ही 26 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठीची प्रवेश पत्र दिनांक 16 मार्च पासून उमेदवारांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध केली आहेत.

 

 

Pune Crime News : महाविद्यालयीन तरुणीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

 

तसेच आवश्यक त्या सूचनेसह प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत ई मेल वर देखील पाठविण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेटचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. प्रवेशपत्र व मूळ ओळखपत्र या शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. 26 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी सकाळी दहा वाजल्यानंतर कोणत्याही सबबीवर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे , (SET Exam News )असे सेट विभागाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.