Talegaon : वापरलेल्या निरुपयोगी वस्तू उपयोगी बनविण्यासाठी आरआरआर केंद्रांची स्थापना

एमपीसी न्यूज – वापरलेल्या वस्तू खेळणी कपडे प्लास्टिकचे साहित्य निरुपयोगी झाल्यानंतर ते इतरत्र टाकून न देता नगरपरिषदेने उभारलेल्या रिड्यूस, रीयूज, रिसायकल (आरआरआर) सेंटर्स मध्ये जमा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी एन के पाटील यांनी केले आहे.

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियान

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत प्रत्येक स्थानिक संस्थांना रिड्यूस, रीयूज, रिसायकल सेंटर्स म्हणजेच आरआरआर केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, तळेगाव (Talegaon) दाभाडे नगरपरिषदेमार्फत दोन आरआरआर केंद्र सुरू करण्यात आली आहेत. केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे शहरामध्ये नगरपरिषद कार्यालय आणि घनकचराव्यवस्थापन केंद्र, मोरखळा अशा दोन ठिकाणी आरआरआर केंद्र 20 मे पासून सुरू केली आहेत.

आरआरआर सेन्टर्सचे उद्घाटन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कार्यालयीन अधीक्षक तसेच आवक जावक प्रमुख रविंद्र काळोखे, स्वच्छता निरिक्षक मयूर मिसाळ तुकाराम मोरमारे, प्रमोद फुले, शहर समन्वयक गीतांजली होनमने, रोहित भोसले, सुजाता घोडेकर तसेच इतर नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, लहान मुलांची खेळणी आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी रिड्यूस, रियूज, रिसायकल, केंद्र स्थापन करणे, तसेच या संकलित वस्तूंचे नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करून विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. या उपक्रमामुळे तळेगाव (Talegaon) दाभाडे शहर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.

त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी वापरलेलीजुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, लहानमुलांची खेळणी आणि इतर निरुपयोगी वस्तू या “आरआरआर” केंद्रावर सुपूर्द करून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.