Chikhali : सव्वालाखाचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा साठवून त्याची विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 1 लाख 19 हजार 279 रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजता कुदळवाडी येथे करण्यात आली आहे.

अखिलेश उर्फ कमलेश रामशब्द जैसवाल (वय 31, रा. कुदळवाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोपं हरिदास इंगळे (वय 33, रा. नारायण पेठ, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाने कुदळवाडी चिखली येथील महालक्ष्मी हॉटेलसमोर असलेल्या कैलाश पान भांडार या टपरीवर शनिवारी सकाळी कारवाई केली. टपरीमध्ये 1 लाख 19 हजार 279 रुपयांचा प्रतिबंधित केलेल्या कंपन्यांचा गुटखा आढळून आला. प्रशासनाने हा गुटखा जपत करत टपरी मालक अखिलेश याच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.