Chinchwad News : सेवा सारथी फाउंडेशनतर्फे गड किल्ले स्पर्धेतील विजेत्यांची शिवनेरी सहल

एमपीसी न्यूज – सेवा सारथी फाउंडेशन आयोजित दिवंगत गिरीश वैद्य यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या गड किल्ला बनवा स्पर्धेतील विजयी संघला शिवनेरी किल्ल्यावर नेण्यात आले.(Chinchwad News) तिथे सर्वांना गड किल्ल्याविषयी माहिती देण्यात आली.

दरवर्षी दिवाळी मध्ये गड किल्ला बनवा सपर्धा घेतली जाते. यावर्षी सुद्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मागील आठवड्यात या स्पर्धेचा निकाल लागला. यामध्ये जे संघ विजयी झाले. त्यांना शिवनेरी किल्ल्यावर नेण्यात आले. तिथे सर्वांना गड किल्ल्याविषयी माहिती देण्यात आली. सर्वांनी घरून आणलेले टिफिन खाल्ले त्यानंतर शिववंदना व पद्य म्हटले आणि महाराजांच्या नावाच्या जयघोषच्या घोषणा दिल्या.

Pimpri News: शहर काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारी यांना च्यवनप्राश देणार – डॉ. कैलास कदम

या सहलीमध्ये एकूण 80 मुलांची उपस्थिती होती. सहल यशस्वी होण्यासाठी ओंकार मांडगे,पंकज दलाल, मंगेश पाटील , शुभम खनका  ,  योगेश पाठक , नितीन कोरडे मनीषा अंबेलवर , मेघा चौघुले , निसर्गा कुलकर्णी ,अर्णव दीक्षित , ईशान मोटे , सिद्धार्थ बोराडे , गौरव गांगुर्डे , प्रणव जाधव ,(Chinchwad News) रोहन शिंदे , शुभम घार्गे , गणेश धुमाल , वैष्णवी , अक्षय , निखिल महाजन , नीरज कुलकर्णी , आदित्य शिंदे , प्रथमेश मुंडे , रोहित परळीकर , सोहन चव्हाण  यांनी मेहनत घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.