BNR-HDR-TOP-Mobile

Hadapsar : कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात सात आरोपींना 24 तासात अटक

0 1,158
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – हडपसर येथे एकाला कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणातील सात जणांना पुणे पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत.

बिट्या उर्फ स्वप्नील कुचेकर, दीपक कुचेकर, संजय कुचेकर, राकेश थोरात, राहुल सावंत, पंकज वाघमारे, तन्मय बडगे, निलेश मधुकर आरते, अक्षय तारू, अंकुश वाडेकर, इम्रान शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रेणुका ढिले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढिले यांचे पती शिवाजी ढिले यांना आरोपींनी धारदार शस्त्राने आणि लाकडी दांडक्यांनी डोक्यात व मानेवर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाले होते.रेणुका ढिले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत 24 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या. हडपसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3