Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातून एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली, भोसरी एमआयडीसी, चाकण, दिघी, हिंजवडी, वाकड परिसरातून सात दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलिसांनी स्थापन केलेल्या वाहन चोरी विरोधी पथकांच्या हाती मात्र, वाहन चोरटे तुरी देत आहेत.

पहिल्या घटनेत अनिल लिंगाप्पा पल्ले (वय 41, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्ले यांनी त्यांची पाच हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / बी डी 0934) घरकुल चौक, हरगुडे वस्ती येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 8 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटनेत विजय विनोद काळुंके (वय 18, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी त्यांची 60 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एस एक्स 4745) त्यांच्या घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या घटनेत मनोहर महादेव मगर (वय 35, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मगर यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ए एल 5319) निघोजे गावाजवळ महिंद्रा कंपनीच्या गेटजवळ पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून चोरून नेली हा प्रकार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या कालावधीत घडली.

चौथ्या घटनेत सागर सीमांचल बेहेरा (वय 24, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. सीधीग्राम, जि. गंजाम, ओरिसा) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एच ई 5159) राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते दुपारी पाच या कालावधीत घडली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

पाचव्या घटनेत गोवर्धन दत्तू झिरपे (वय 50, रा. सुसगाव, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झिरपे यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 12 / जी पी 3689) बोपखेल रोडवरील विद्युत स्टेशनमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. हा प्रकार 31 जानेवारी रोजी दुपारी दोन ते रात्री साडेसात या कालावधीत घडली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

सहाव्या घटनेत राजेश बबनराव शिंदे (वय 33, रा. भूगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांनी त्यांची 20 हजार रुपये कितमीची दुचाकी (एम एच 12 / एफ टी 6543) चांदणी चौकातील जुन्या पेट्रोल पंपावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. हा प्रकार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

सातव्या घटनेत राधा नितीन अहुजा (वय 30, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अहुजा यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ई क्यू 660) काळेवाडी फाटा येथील प्राईड पर्पल बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते रात्री सात या कालावधीत घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like