Sangvi : लोखंडी पत्रे व अँगल चोरी प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेच्या रक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे व अँगल चोरून नेले. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी 2018 रोजी पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय काळुराम दळवी, संदीप काळुराम दळवी, प्रदीप काळुराम दळवी, अजय बाळासाहेब दळवी, आदर्श उपाध्ये, प्रमोद उपाध्ये (सर्व रा. पिंपळे निलख) अशी चोरीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तानाजी यशवंत चोंधे (वय 73 रा. औंध, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चोंधे यांच्या मुलीच्या नावावर पिंपळे निलख येथे जमीन आहे. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या मुलीच्या जागेलगत उभारलेले पत्र्याच्या शेडचे पत्रे व लोखंडी अँगल असा एकूण 60 हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.