Pune : महापालिका स्थापनेपासून सात वेळा विकास आराखडा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून शहराचा विकास आराखडा 7 वेळा करण्यात आला आहे. 1966 मध्ये आरक्षणे सुमारे 18 टक्के, रस्ते 29.85 टक्के, 1987 मध्ये आरक्षणे 14.28 टक्के, तर रस्ते सुमारे 68.30 टक्के अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

नगरसेविका छाया मारणे यांनी यासंदर्भात माहिती मागितली होती. महापालिकेच्या ताब्यात 638 अॅमिनेटी स्पेस आलेल्या आहेत. महापालिकेच्या डीपीनुसार 12 हजार 691 आरक्षणे ताब्यात आलेली आहेत. आरक्षणाचे एकूण क्षेत्रफळ 1,78,04,974.71 चौ. मी. आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.