Pune : पुण्यातील टिंबर मार्केट मधील लाकडाच्या सात ते आठ गोडाऊनला भीषण आग 

अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.तर या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम सुरू आहे.

Todays Horoscope : 25 May 2023 जाणून घ्या – आजचे राशिभविष्य

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील रामोशी गेट जवळ असलेल्या लाकूड सामान असलेल्या सात आठ गोडाऊनला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये गोडाऊन मधील लाकडाचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून अद्याप ही आग सुरूच आहे.

त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम सुरू आहे. यासाठी पुणे शहर, पुणे (Pune) कॅन्टोमेंट पीएमआरडीए च्या अशा एकूण अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. तर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.