Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून सात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण, चिखली, निगडी, दिघी, भोसरी, पिंपरी आणि वाकड परिसरातून सात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 18) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशाल मारुती कोळेकर (वय 29, रा. कोये, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळेकर यांच्या घराच्या शेजारील पत्र्याच्या शेडमधून त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

मिट्टप्पा पिराप्पा राठोड (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राठोड यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरट्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आला.

अतुल केशव भावसार (वय 42, रा. सिंधुनगर, प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावसार यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी जुना मुंबई पुणे महामार्गावर आकुर्डी येथील फोर्स मोटर्स कंपनीच्या गेट समोरून चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी साडेआठ ते रात्री सात या कालावधीत घडली.

संदीप प्रल्हाद रोडे (वय 35, रा. इंद्रायणीनगर, देहूफाटा) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोडे यांच्या घराजवळ पार्क केलेली त्यांची 30 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

अश्वजीत महेंद्र निकम (वय 30, रा. पिंपळे गुरव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निकम यांची 55 हजारांची दुचाकी चोरट्यांनी नाशिक फाटा पुलाखाली, कासारवाडी येथून चोरून नेली. हा प्रकार 9 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री उघडकीस आला.

सुभाष शामराव कांबळे (वय 52, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कांबळे यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी चिंचवड एमआयडीसी मधून चोरीला गेली. हा प्रकार 9 ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आला.

सुरेश चंपालाल जैन (वय 55, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जैन यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरटयांनी 16 नंबर बस स्टॉप येथून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 18) दुपारी साडेबारा ते पावणे एक वाजताच्या कालावधीत घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.