Pimpri Crime News : बॅंकेची 5 कोटी 75 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अमर मुलचंदानी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – नियमबाह्य कर्ज मंजूर करून बॅंकेची तब्बल 5 कोटी 75 लाख 63 हजार 56 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2015 ते 2021 दरम्यान दि सेवा विकास को. ऑपरेटिव्ह बॅंक, पिंपरी याठिकाणी हा प्रकार घडला.

याप्रकरणी विजयचंद गोपीचंद रामचंदानी (वय 52, रा. पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि.02) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार माजी नगरसेवक व दि सेवा विकास बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी (वय 61, रा. पिंपरी) यांच्यासह मॅनेजर रश्मी तेजवानी (वय 54, रा. पिंपरी), अकाऊंटंट हरेश चुगवानी (वय 52, रा. पिंपरी) सहायक जनरल मॅनेजर विजय चांदवानी (वय 55, रा. पिंपरी), जॉइंट सी.ई.ओ रमेश हिंदुजा (वय 62, रा. पिंपरी), ॲडिशनल सी.ई.ओ हिरामनी मुलाणी (वय 62, रा. पिंपरी), सी.ई.ओ तुलजो नारायण लखाणी (वय 80, रा. पिंपरी), उर्वशी उदारामाणी ऊर्फ रिया महेश परयाणी (वय 35, रा. पिंपरी), शहाबाज अब्दुल अजिज शेख (वय 43, रा. शास्त्रीनगर, येरवडा), हया शहाबाज शेख (वय 44, रा. शास्त्रीनगर, येरवडा), शीतल तेजवाणी वय 40, रा‌. पिंपरी), गिरीप तेजवाणी (वय 39, रा. पिंपरी), सागर सुर्यवंशी (वय 43, रा. पुणे), महादेव उर्फ बल्ला साबळे (वय 40, रा. पिंपरी), गणेश वर्मा (वय 48, रा. चिंचवड), किशोर केसवाणी (वय 62, रा. पिंपरी) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून नियमबाह्य कर्ज मंजूर केले. आरोपींनी कर्जाचे हप्ते थकवून बॅंकेची तब्बल 5 कोटी 75 लाख 63 हजार 56 रुपयांची फसवणूक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.