Pimpri Chinchwad : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघचा सातवा वर्धापन दिन संपन्न.

एमपीसी न्यूज  : श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघचा सातव्य वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक १७ जानेवारी २१ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत ज्येष्ठांसाठी मोफत डोळ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले. यात १९० ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक व सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिनारायण शेळके, राजू गुणवंत, प्रकाश शिंदे, अशोक सुर्यवंशी, अशोक खडसे, निता खरे, शोभा नलगे, पुष्पा भोळे. तसेच डॉ महेश पवार व त्यांच टीम यांनी परिश्रम घेतले.

रविवारी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत विठ्ठल काटे संस्थापक अध्यक्ष नवचैतन्य हास्ययोग परिवार पुणे व  सुमन काटे यांचा हास्य कल्लोळ हा कार्यक्रम प्रात्यक्षिकासह सादर केला. यावेळीअध्यक्षस्थानी  नारायण बहिरवाडे (मा नगरसेवक)होते. संघाचे अध्यक्ष  हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक व सन २०२० मध्ये घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.

या प्रसंगी अरुण बागडे (महासंघ अध्यक्ष) सर्वश्री राजू गुणवंत,प्रकाश शिंदे,सुर्यवंशी, अशोक खडके, संतोष शेळके, विविध संघांचे अध्यक्ष व पदाधिकारी व संघाचे आजीव सभासद  होते. सुत्र संचालन  राजाराम सावंत यांनी केले.अशोक सुर्यवंशी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली ‌.त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.