T20 Cricket Tournament : सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा

स्मार्ट लायन्स् संघ अंतिम फेरीत !

एमपीसी न्यूज : अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-20 क्रिकेट ( T20 Cricket Tournament) स्पर्धेत आयेश शेख हिच्या कामगिरीमुळे स्मार्ट लायन्स् संघाने वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबचे 10 गडी राखून धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली.

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ 50 धावाच जमविता आल्या. माधुरी आगव हिलाच फक्त दुहेरी धावसंख्या गाठता आली. स्मार्ट संघाच्या रोहीनी माने (2-6), किरण नवगिरे (2-14) आणि वैष्णवी के. (2-17) यांनी अचूक गोलंदाजी करून वॉरीयर्स संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे आव्हान स्मार्ट लायन्स्ने 6.2 षटकात पूर्ण केले. आयेशा शेख हिने नाबाद 34 धावा तर, करीष्मा शिंदे हिने नाबाद 14 धावा करून संघाचा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

Talegaon Dabhade News : राष्ट्रीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात 40 लाभार्थ्यांचा सहभाग

उपांत्य फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकाल : T20 Cricket Tournament 

वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबः 15.3 षटकात 10 गडी बाद 50 धावा (माधुरी आगव 19, रोहीनी माने 2-6, किरण नवगिरे 2-14, वैष्णवी के. 2-17) पराभूत वि. स्मार्ट लायन्स्ः 6.2 षटकात बिनबाद 53 धावा (आयेशा शेख नाबाद 34 (22, 7 चौकार), करीष्मा शिंदे नाबाद 14); सामनावीरः आयेशा शेख.

https://www.youtube.com/watch?v=-GVeGPkb0SI

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.