BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शिवणे – उत्तमनगर भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी

एमपीसी न्यूज – शिवणे – उत्तमनगर भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सोमवारी पुणे महापालिकेमार्फत 98 लाख 50 हजार रुपये इतक्या किमतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

जिजाई गार्डन ते शिंदे पूल शिवणे या कामाचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिंदेपूल  नवनाथ दांगट पाटील चौक शिवणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 20 जानेवारी) सायंकाळी 6 वा. हा कार्यक्रम होणार आहे.

त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांनी केले आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही सचिन दोडके यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like