Pune News : बालेवाडी फाट्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड, आठ महिलांची सुटका तर दोघी अटकेत

एमपीसी न्यूज : गरीब आणि गरजू महिलांना मसाज सेंटर मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांना चतुशृंगी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी बाणेर येथील कनक स्पा याठिकाणी सुरू असणाऱ्या मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. तर या ठिकाणाहून आठ महिलांची सुटका केली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बाणेर येथील कनक स्पामध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी खातरजमा करून बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यांना या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी असलेल्या 23 ते 35 वयोगटातील आठ पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली. तर वेश्याव्यवसाय चालवणारी स्पा मालक 45 वर्षीय महिला आणि मॅनेजर 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला या सर्व महाराष्ट्रातील आहेत. पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या या महिलांना पैशाचे आमिष दाखवून या ठिकाणी आणले जाते आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जाते. आरोपी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतात आणि त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे आढळल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.