Pune : स्वारगेट परिसरातील मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज- मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारा वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने छापा टाकून उघडकीस आणला आहे. शंकरशेठ रस्त्यावरील कुमार पॅसिफिक मॉलमध्ये असलेल्या मसाज पार्लरवर सोमवारी (दि 1) रात्री सव्वानऊ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी गोपाळ कमल हलदर ( वय 26, रा. खराडी) आणि रॉबिन थॉमस (वय 31, रा. विमानगर) यांंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार शकील सत्तर शेख यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार पॅसिफिक मॉलमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती खबऱ्याकडून संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मसाज पार्लरवर छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.