Pune : कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस; एका परदेशी महिलेची सुटका

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस आणून एका परदेशी महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

बाळू बाळासाहेब सातपुते (रा.विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू सातपुते हा आपल्या साथीदारांसोबत महिलांना पैशासाठी वेश्या व्यवसाय करण्यास लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील रूमवर छापा टाकून परदेशी महिलेची सुटका केली. बाळू सातपुते याला न्यायालयाने 8 आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.