Pune News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका तर दोघांना अटक

एमपीसी न्यूज : लोकवस्तीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटकही केली. तर या ठिकाणाहून दोन सज्ञान महिलांची सुटकाही करण्यात आली. भिगवन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील लोकवस्तीत हे सेक्स रॅकेट कार्यरत होते. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मिनीनाथ रमेश गायकवाड ( वय 28, सध्या रा.बारामती रोड, मदनवाडी,ता इंदापूर) व रोहिदास गंगाराम दराडे( वय 29,रा. अकोले.ता इंदापूर) या दोघांना अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,  पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगत असणाऱ्या रहिवाशी इमारतीत अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिगवण पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी मिनीनाथ गायकवाड, रोहिदास दराडे दोन महिलांकडून अवैधपणे कुंटणखाना चालवित असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल व रोख रक्कम मिळून 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.