Pune – पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस ; एकाला अटक

एमपीसी न्युज – सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणारे सेक्स रॅकेट उघडकीस आणून एकाला अटक केली आहे. ही कारवाई कॅम्प येथील हॉटेल सागर प्लाझा येथे करण्यात आली आहे.

गणेश भीम बिस्टा (वय 36, रा. वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या एजंट चे नाव आहे.याप्रकरणी पोलीस नाईक तुषार आल्हाट यांनी फिर्यादी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरची परिस्थिती बेताची असलेल्या तरुणीची ग्राउंड स्टाफची नोकरी सुटल्यानंतर ती कामाच्या शोधात असताना तिची गणेश बिस्टाशी ओळख झाली व त्याने तरुणीला पैशांचे आमिष दाखवून पुण्यात आणले व कॅम्प येथील सागर प्लाझा या पंचतारांकित हॉटेल येथील रूम बुक करून हे सेक्स रॅकेट चालवत होता.

सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तरुणीला ताब्यात घेऊन गणेश बिस्टाला अटक केली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष देशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.