Crime News : ‘सेक्स तंत्र’ लैंगिक प्रशिक्षण देण्याच्या जाहिरातीने पुण्यात खळबळ

एमपीसी न्यूज – पुण्यात सोशल मीडियावरील एका जाहिरातीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गुरुवारी सोशल मीडियावर सेक्स तंत्र नावाने नवरात्र स्पेशल कॅम्प म्हणून एक जाहिरात वायरल झाली.या जाहिरातीद्वारे एक ते तीन ऑक्टोबर दरम्यान लैंगिक प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली.पाहता पाहता ही जाहिरात सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनतर्फे या प्रशिक्षण कॅम्पची जाहिरात करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीत एक मोबाईल क्रमांक दिला आहे.या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 15 हजार रुपये शुल्क आकारले जाईल.तसेच यामध्ये वैदिक सेक्स तंत्रासह चक्र एक्टिवेशन ओशो मेडिसन यासारख्या विविध गोष्टी शिकवल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.याशिवाय या जाहिरातीत व्हाट्सअपसाठी एक कोड ही देण्यात आला आहे.त्यामुळे ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

या जाहिरातीवरून सर्वत्र टीका होत असताना पुणे पोलिसांनीही या जाहिरातीची दखल घेतली आहे. ही जाहिरात कोणी तयार केली? ही जाहिरात तयार करण्यामागचा उद्देश काय आहे याची माहिती घेण्यासाठी आम्ही संबंधित क्रमांकावर फोन केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र फोन बंद असल्यामुळे आम्हाला अद्याप उत्तर मिळाले नाही. संबंधित कंपनीला आम्ही मेल पाठवला असून त्याचे उत्तर आल्यानंतरच त्या संदर्भातली पूर्ण माहिती करू शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.