Pune News : सेक्स टुरिझम रॅकेटचा पर्दाफाश, दोन तरुणींची सुटका तर दोन महिला ताब्यात

एमपीसी न्यूज : स्थानिक पोलिसांनी वेश्याव्यवसाय विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांनी अनोखी शक्कल वापरली. सेक्स टुरिझम या गोंडस नावाखाली तरुणींना ग्राहकासोबत भारतातल्या मनपसंत ठिकाणी फिरण्यासाठी पाठवला जायचं. याच सेक्स टुरिझम रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली तर सेक्स टुरिझम चालवणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला एक महिला वेगळ्या प्रकारे सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या महिलेला याआधीही 2020 मध्ये वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि मुंबई एअरपोर्ट वरून बाहेर जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन महिलांना अटक केली. तर ग्राहक दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी सेंटर होम मध्ये केली.

सेक्स टुरिझम रॅकेट चालवनारे आधी ग्राहक शोधायचे. ग्राहक मिळाल्यानंतर डील फायनल झाली की संबंधित ग्राहकाला तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटनस्थळावर पाठवायचं. या रॅकेटची सर्वाधिक पसंती ही गोव्याला होती. आरोपी आधी ग्राहकाला संबंधित तरुणीचा फोटो पाठवायचे. ग्राहकाने तरुणीची निवड केल्यानंतर त्यालाच विमानाचं तिकीट काढायला लावायचे. दोन दिवसासाठी ते 50 हजार रुपये घ्यायचे. त्यानंतर त्यांना इच्छित स्थळी संबंधित ग्राहक घेऊन जात असे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.