Talegaon Crime News : केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

एमपीसी न्यूज – केक बनवण्याच्या क्लासला जाणा-या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सप्टेंबर 2020 ते 22 मे 2021 या दरम्यान तळेगाव एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पिडित अल्पवयीन मुलीच्या आईने (शनिवारी, दि.22) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी मंगेश बाळु पडवळ (रा. नवलाख उंबरे, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी केक बनवण्याच्या क्लासला जात असताना आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. आरोपीने मुलीचा हात धरून ‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अशा केक बनवण्याच्या भंगार क्लासला का जातेस’? असे, म्हणून तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.