Chakan : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना फेब्रुवारी 2019 ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चाकण येथे घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुक्तार इस्माईल पठाण (वय 25, रा. झित्राईमळा, चाकण), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्याच्या रिक्षातून नेऊन तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याच्या अडीच महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.