Chinchwad : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना बर्ड व्हॅली उद्यान येथे घडली.

व्यंकटेश जगदाळे (रा. विद्यानगर, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 28) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलीसोबत आरोपीने मागील सात ते आठ महिन्यांपासून ओळख वाढवून तिला संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानात नेले. त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून आरोपीने तिच्यावर मागील सात ते आठ महिन्यापासून लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.