Chinchwad Crime News : 31 वर्षीय इसमाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार 

एमपीसी न्यूज – 31 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (दि.22) सकाळी अकरा वाजता चिंचवड परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

तुकाराम रामचंद्र राजनवरु (वय 31, रा. विद्या नगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने अल्पवयीन मुलीला तू मला आवडतेस असे म्हणत, लैंगिक आत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दाखल फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.