Hinjawadi : लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईकाकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – एका नातेवाईकाने प्रेमाचे नाटक करून विश्वास संपादन केला. तसेच लग्नाचे आमिष दाखवून फिरायला घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली. हा प्रकार 15 ऑक्टोबर 2015 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान घडला.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या 32 वर्षीय नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी तरुणीचा नातेवाईक आहे. त्याने फिर्यादी तरुणीशी प्रेमाचे नाटक करून जवळीक साधून विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला बावधन, सिंहगड, बाणेर तसेच श्रीवर्धन (जि. रायगड), गणपतीपुळे (जि. रत्नागिरी), मालवण, तारकर्ली (जि. सिंधुदुर्ग) व कोल्हापूर येथे फिरायला घेऊन गेला. तेथे तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादी तरुणीने लग्नासाठी विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार देऊन तरुणीची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like